सेलू, प्रतिनिधी
सेलू येथील बसस्थानकावर दुपारी एक वाजायच्या सुमारास विद्यार्थी नीची छेड काढणा-या तीन तरुणांना पैकी विद्यार्थीनीच्या तावडीत सापडलेल्या एका तरुणास विद्यार्थीनी चपलेनी बेदम मारहाण केली. बसस्थानकावर पोलीसच नसल्यामुळे अनेक विद्यार्थीनी आपल्या रागाचा बदला घेतला. सेलू बसस्थानकावर असे प्रकार नेहमी चालूच असतात पण तक्रारच होत नसल्याने छेडछाड करणाराचे फावते. बसस्थानकात हा मारहाणीचा गोंधळ सुमारे तासभर चालू असताना पोलीसाची गाडी आली. पण विद्यार्थीनी या तरुणास पोलीसाच्या स्वाधीन करण्यास नकार देऊन बसस्थानक ते पोलीसठाण्या पर्यंत रस्त्याने मारहाण करत या तरुणाची धिंड काढली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सेलू पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या तरुणास
वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें