स्वच्छता हिच सेवा २०१८ उपक्रमांतर्गत स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 28 सितंबर 2018

स्वच्छता हिच सेवा २०१८ उपक्रमांतर्गत स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;

आ.अब्दुल सत्तार यांच्यासह नागरिकांनी घेतली शपथ  ठेवूया स्वच्छ व सुंदर शहर.


सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२७) -
सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)स्वच्छता हिच सेवा २०१८ या उपक्रमांतर्गत स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड कार्यक्रम संपन्न झाला. स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड कार्यक्रमाची सुरुवात माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

सिल्लोड नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमात सर्व नागरिक , विविध सामाजिक संघटना, बचत गट, शाळा, महाविद्यालय , व्यापारी वर्ग या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ शहर करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे .
सोमवार (दि.१७ ) रोजी स्वच्छता मोहीम व श्रमदान या उपक्रमाची सुरुवात प्रियदर्शनी चौक पासुन संपुर्ण सिल्लोड शहरात राबविण्यात आली .

गुरुवार (दि.२७ ) रोजी स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता शहरातील प्रियदर्शनी चौक येथे माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार, बाजार समिती उप सभापती नंदकिशोर सहारे,  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

सिल्लोड येथे नगरपरिषद वतीने माझा शहर माझा परिसर स्वच्छ ठेवीन व स्वच्छतेसाठी परिसरातील नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सहभागी करून घेईल या व शहर स्वच्छता व सुंदर कार्यासाठी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सामूहिक शपथ घेतली.

यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, शंकरराव खांडवे, शेख मोहसीन, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, सलिम हुसैन, मनोज झवर, संजय आरके, शेख बाबर बागवान, संजय मुरकुटे, सत्तार हुसैन, कैसर आझाद, मनोज कोठाळे,  मिर्झा सांडूबेग, राजेश्वर आरके, हाजी मोहम्मद हनिफ, अमित आरके,  गणेश डकले, अकिल देशमुख, मतीन देशमुख, सखाराम अहिरे, रावसाहेब शिरसाठ, मनोहर आरके, लड्डू पटेल, शेख मोबिन,
जगन्नाथ कुदळ, जितु आरके, फईम पठाण, रवि आरके यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कायंदे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, निवृत्त उप मुख्यधकारी ए एम पठाण, अधिक्षक सुनील गोराडे, ईश्वर शिमरे, निसार शेख, प्रकाश बन्सोड, विठ्ठल दोरखे, सुधाकर पाथरीकर आदींसह शहरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकार कार्यकर्ते विभाग प्रमुख  कर्मचा-यांसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची व नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्याची सामूहिक शपथ माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली.

 सिल्लोड येथे नगरपरिषद वतीने माझा शहर माझा परिसर स्वच्छ ठेवीन व स्वच्छतेसाठी परिसरातील नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सहभागी करून घेईल या व शहर स्वच्छता व सुंदर कार्यासाठी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सामूहिक शपथ घेतली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें