पालम शहर व परिसरातील वरहाच्या,डुक्कराच्या वाढत्या सुळसुळाटामुळे नागरिकांना त्रास पालम नगर पंचायत तर्फे आॅटो लावुन जनजागृती करून डुक्करांच्या मालकावर कार्यवाही करणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

पालम शहर व परिसरातील वरहाच्या,डुक्कराच्या वाढत्या सुळसुळाटामुळे नागरिकांना त्रास पालम नगर पंचायत तर्फे आॅटो लावुन जनजागृती करून डुक्करांच्या मालकावर कार्यवाही करणार.




पालम (अनीस खुरेशी )

पालम शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वराह पालन व्यवसाय  होत आहे,पालम शहरातील वराह पालन व्यवसायीक स्वतःच्या मालकिच्या जागेतील बंदिस्त ठिकाणी वराह पालन न करता मागिल अनेक वर्षांपासून शहरात मोकळे सोडून दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पालम शहरातील नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.

पालम शहरातील धार्मिक संस्थांमध्ये मोकाट वराह येऊन दुर्गंधी करीत आहे.संध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वराहमुळे रोगराईत वाढ झालेली आहे. मागिल काळात एम आय एम या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठपुरावा करून संबंधित सुभाष जाधव,लक्ष्मीबाई  खंड्डु गायकवाड,सिताराम गायकवाड,दत्ता गायकवाड,संतोष गायकवाड या वराह मालकावर नगर पंचायत मार्फत कायदेशीर नोटिसा पाठवले आहे.वराहाच्या बंदोबस्ता करिता अनेक तक्रारी प्रलंबित आहे.याच कारणामुळे पालम नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर व नगर अध्यक्ष यानी नगर पंचायत येथील मिटींगमध्ये  पालम शहरातील वराह पालन व्यवसायीकांनी तिन दिवसात स्वतःच्या वराह घेऊन जावे किंवा  यासाठी नगर पंचायत शहरात जनजागृती करून महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अन्वये संबंधित वराह मालकावर कायदेशीर कार्यवाही करणार असे म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें