सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२३सप्टेंबर २०१८
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांसाठी येथील रोटरी क्लब च्यावतीने शुध्द व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव चंद्रकांत लोमटे व रो.नागनाथ सातभाई यांनी स्वतः थांबून भाविकांना पाणी वाटप करून शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब सोनपेठने यापुर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. यात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय, झाडांना जाळीचे कुंपण, वृक्षारोपन, विद्यार्थ्यांना बक्षीसे, शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करणे, शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी आदींसह अनेक उपक्रमाचा समावेश आहे. त्यातच आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढलेल्या मिरवणूकीत सहभागी गणेश भक्तांना शुध्द व थंड पाणी वाटपाने भक्त मंडळीने समाधान व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें