डिघोळ (दे.) येथील श्री रेणुकादेवी मंदिर परिसर केला प्लास्टिक मुक्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 23 सितंबर 2018

डिघोळ (दे.) येथील श्री रेणुकादेवी मंदिर परिसर केला प्लास्टिक मुक्त.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२३सप्टेंबर २०१८
वृक्षारोपन व संवर्धन सामाजिक चळवळ सोनपेठ, व  नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास-भारत द्वारे सोनपेठ तालुक्यातील डिघोळ (दे.) येथील श्री रेणुकादेवी (त्रिपिटीका) माळरान परिसरात वृक्षारोपन व लावलेल्या सर्व झाडांना हातपंपाचे पाणी उपसून जीवदान देण्याचे काम चालू आहे. रेणुकादेवीच्या दर्शनास दूरवरून भाविक भक्त येत असतात, त्यावेळी त्यांनी सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाऊन अस्ताव्यस्त फेकलेल्या प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, पाण्याच्या बॉटल, कॅरीबॅग आदी कचरा एकत्र करून रेणुकादेवी मंदिर परिसर स्वच्छ केला. श्री रेणुकादेवी माताचे हे मंदिर प्राचीन असून मंदिराचे पावित्र्य व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नै. पर्या.संवर्धन व मानवता विकास परभणी जिल्हाध्यक्ष वृक्षमित्र महेश जाधव सर यांनी केले.
या प्रसंगी या स्वछता मोहिमेत नै.पर्यावरण संवर्धन व मानवता विकासचे परभणी जिल्हा सचिव माऊली आदत, पाथरी तालुका अध्यक्ष.दत्ताराव मोरे व सोनपेठ तालुका उपाध्यक्ष सुशील सोनवणे आदी मान्यवर व डिघोळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें