सेलू प्रतिनिधी
(सेलू) छोट्या पडद्यांवरील अनेक मालीकांमधुन राष्ट्रभक्ती,देशसेवा या संस्कारासह कौटुंबीक, सामाजीक व स्ञीशक्तीच्या संघर्षाचा हुंकार पहावयास मिळतो त्यामुळे या मालीकांमधुन मनोरंजनासह आधुनिक काळातील सामाजीक समस्यांचे यथार्थ दर्शन घडते त्यामुळे याकडे सकारात्मकतेने पहावे असे आवाहन नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे यांनी केले.
येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेत मला आवडलेली टी.व्ही.मालीका या विषयावर (शुक्रवार दि. 21 रोजी )आधारीत परीसंवाद कार्यक्रमात अध्यक्ष
म्हणुनते बोलत होते. या परिसंवादात सौ. स्वामी रोडगे यांनी "तु माझा सांगाती " सौ.सुमीता पाठक - सबनीय - स्वराज रक्षक संभाजी, सौ.जयश्री सोन्नेकर - तारक मेहता का उलटा चष्मा, रवी मुळावेकर - सुर नवा ध्यास नवा, प्रा.ए.डी.कुलकर्णी - माझ्या नवरयाची बायको या मालीकांवरील परिसंवादात अभ्यासपुर्ण विचार मांडुण श्रोत्यांना विवीध कौटुंबिकसंस्कार व सामजीक विषयांवर चिंतक करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संयोजन व सुञसंचलन मोहन बोराडे, आभार व्याख्यानमालेचे चिटणीस गिरीश लोडाया यानी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, के. व्ही.वाघमारे,बाबासाहेब चारठाणकर, सौ.संघमिञा कांबळे, सौ. मिरा बहिवाल, सौ. मिना मालाणी, नारायण ईक्कर, बी. के गांजापुरकर आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें