न्याय आणि लोकशाही रक्षणासाठी पत्रकारीता - सुभाष सुरवसे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 सितंबर 2018

न्याय आणि लोकशाही रक्षणासाठी पत्रकारीता - सुभाष सुरवसे.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२०सप्टेंबर २०१८
अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणे, हुकुमशाही विरूद्ध भूमिका घेणे, जनजागृती करणे हे काम पत्रकारीतेकडून होत असते. थोडक्यात न्याय व लोकशाहीचे रक्षण करण्याकरीता असणारा व्यवसाय म्हणजे पत्रकारीता असे मत पत्रकार सुभाष सुरवसे यांनी केले, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्ता केशव पवार होते,  तर प्रा. डॉ. संतोष रणखांब यांची उपस्थिती होती.
करियर अँड कौन्सिलिंग सेलच्या वतीने पत्रकारीता व्यवसायाबद्दल माहीती देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दै. लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुभाष सुरवसे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारीतेमधील विविध पैलूंबरोबरच पत्रकारीता व्यवसाय म्हणून करणे ही मोठी समाजसेवा आहे. चांगल्या बाबी लोकांपर्यत पोहोचवणे, वाईटांना उघडे पाडणे, तसेच न्याय, समता, लोकशाही या मुल्यांची जपणुक करण्याचे काम पत्रकार करत असतो. या व्यवसायात,  साहस, ज्ञान व चांगले आचरण याची अधिक गरज असते. असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक दत्ता केशव पवार यांनी व्यवसाय कोणताही असो प्रामाणिकपणे केल्यास ती देशसेवाच असते, मानवी समुदायाच्या विकासासाठी प्रामाणिकपणाने व निष्ठेने केलेला व्यवसाय मदत करणारा ठरत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन करियर अँड कौन्सिलिंगचे समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी वडचकर व समिती सदस्य प्रा. डॉ. अंबादास बर्वे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा शिंदे, सुत्रसंचालन वैष्णवी येवतीकर तर आभार जना तोंडगे यांनी मानले. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें