पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद.

औरंगाबाद बिडबायपास वरील मस्के पेट्रोल पंपावर आंदोलन करताना कार्यकर्ते.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक.

वि.प्रतिनिधी.इमरान खान.
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें