निवडणुका कृषी धोरणावरच व्हाव्यात-अनिल घनवट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 सितंबर 2018

निवडणुका कृषी धोरणावरच व्हाव्यात-अनिल घनवट.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२७सप्टेंबर २०१८
देशातील येणाऱ्या निवडणुका ह्या फक्त शेती धोरणावरच व्हाव्यात या साठी शेतकरी संघटनेच्या शिर्डी येथील अधिवेशनात याबाबत चर्चा करण्यात येनार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी थडी पिंपळगाव येथील सभेत बोलतांना सांगितले.
भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील ७०% जनता शेती व्यवसायावर अवलंबून असतांना, आजपर्यंत देशातील एकही निवडणुक शेती धोरणावर झाली नाही. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकात शेती हाच महत्त्वाचा मुद्दा व्हावा, शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दि.१०,११ व १२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन आयोजित केले असुन; या अधिवेशनास देशभरातुन दहा लाख शेतकरी येणार असल्याचेही यावेळी बोलताना अनिल घनवट यांनी सांगितले. यावेेेळी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्ष सिमा नरोडे यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याची लढाई लढणाऱ्या विश्वंभर गोरवे, अंगद काळे व कृषी हवामान अभ्यासक पंजाब डख आदींचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सतीश दाणी, अनिल चव्हाण, गजानन देशमुख, अशोकराव चांदवडे, माधव जाधव, पत्रकार कृष्णा पिंगळे, सिध्देश्वर गिरी आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सभेचे प्रास्ताविक सुधीर बिंदू यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें