सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२६सप्टेंबर २०१८
जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत एल.आर.के.इंग्लिश स्कूलने दबदबा कायम राखत स्कूलचा विद्यार्थी शाम रामभाऊ धर्मे याने जिल्हास्तरावर मैदानी क्रीडा स्पर्धेत १०० मीटर व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अनुक्रमे द्वितीय व प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. यावेळी प्रमाणपत्र वितरीत करताना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते माधव शेजुळ, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुजीत माळी, सहशिक्षक आरबाड आदी दिसत आहेत.
या यशाबद्दल चि.शाम धर्मे याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें