सेलूचा शैक्षणिक वारसा जपणे हेच ध्येय=श्री महेश कुलकर्णी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

सेलूचा शैक्षणिक वारसा जपणे हेच ध्येय=श्री महेश कुलकर्णी.



सेलू प्रतिनिधी

     सेलू नगर परिषद सेलू आणि चिन्मय शिकवणी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि 01 सप्टेंबर रोजी हेमंत नगर , शिवाजी नगर भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी चिन्मय मोफत शिकवणी वर्गाचे उदघाटन सेलूचे नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर मोफत शिकवणी वर्गाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे महेश कुलकर्णी (वाकडीकर) ,नगरसेवक शेख रहीम शेख गुलाम,नगरसेविका सौ उषा रमेश दौड,,श्री अशोक कासार उपस्थित होते.

      यावेळी प्रास्ताविकामध्ये  महेश कुलकर्णी म्हणाले कि, सेलूचा उन्नत शैक्षणिक वारसा जपणे आणि गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे. जे विद्यार्थी आर्थिक बाजूने कमकुवत आहेत आणि शिकवणीची फीस भरू शकत नाहीत अश्या विद्यार्थ्यांसाठी
चिन्मय मोफत शिकवणी वर्ग वरदान ठरेल असे ते यावेळी म्हणाले.
 कार्यक्रमाचे उदघाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोद बोराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे आणि प्रथम,द्वितीय आणि त्रितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3000रु, 2000रु, 1000रु देण्याचे तसेच  या चिन्मय मोफत शिकवणी वर्गास नगर पालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वाशन दिले.
यावेळी फरहा नाज़ बेग या विद्याथिनीने तिला 10 वि परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशात चिन्मय शिकवणीचा वाटा किती महत्वाचा होता हे मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टाके डी पी तर आभार श्री चव्हाण जे पी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नागरिक आणि नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें