वाढदिवसानिमित्त प्रा.डॉ. वनिता कुलकर्णी यांची ग्रंथभेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

वाढदिवसानिमित्त प्रा.डॉ. वनिता कुलकर्णी यांची ग्रंथभेट.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३सप्टेंबर २०१८.

येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथभेट देण्याची परंपरा असून; आज दि.०३सप्टेंबर रोजी हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी विषयाची पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, ग्रंथपाल प्रा.डॉ. आनंत सरकाळे यांनी सदरील ग्रंथभेट स्विकारली. यावेळी ग्रंथालय समिती सदस्यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ.कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट दिल्याबद्दल ग्रंथपाल प्रा. डॉ. आनंत सरकाळे यांनी प्रा.डॉ. वनिता कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें