सोनपेठ (प्रतिनिधी) दि.२२सप्टेंबर २०१८.
सोनपेठ विटा रोडवरील अवैध प्रवाशी वाहतुक करणारी जीप व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि.२२सप्टेंबर रोजी दुपारी ४वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमी तरूणांस पुढील उपचारासाठी स्वा.रा.ती.वैद्यकीय रूग्नालय व महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
सोनपेठ पासुन जवळच असलेल्या वाणीसंगम येथील वनमारोती मंदिरा जवळ सोनपेठहुन मोटारसायकलवरून विट्याकडे घरी निघालेल्या अशोक हारकाळ व पाथरीहुन सोनपेठ कडे येणाऱ्या अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या जीपची समोरासमोर जोरात धडक झाली. यात मोटारसायकलस्वार हारकाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता दवाखान्यात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता; तब्बल एक तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें