विवेकानंद बालक मंदिरात मातृदिन उत्साहात साजरा.माता पालक व विध्यार्थी यांची वेशभूषा स्पर्धा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

विवेकानंद बालक मंदिरात मातृदिन उत्साहात साजरा.माता पालक व विध्यार्थी यांची वेशभूषा स्पर्धा संपन्न.




सेलू प्रतिनिधी


सेलू आई ही संस्काराची जननी आहे. आई या दोन शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतुट सामर्थ्य आहे.आई आपल्या मायेने ,त्यागाने ,आपुलकीने ,घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त व्हावा या हेतुने विवेकानंद बालक मंदिरात मातृदिनाचा व बैल पोळा सजावट कार्यक्रम दिनांक ७ सप्टेंबर शुक्रवार रोजी घेण्यात आला.त्यानिमित्त बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बैल सजावट केली. तसेच माता व विध्यार्थी यांनी युगपुरुष व त्यांची माता ही वेशभूषा छोट्याश्या संवादात सादर केली. जिजामाता- शिवाजी महाराज , माता भुवनेश्वरी - विवेकानंद , यशोदा - श्याम , जगराणी देवी - चंद्रशेखर आझाद , सखुबाई - गाडगेबाबा , रुक्मिणी देवी - विनोबा या  वेशभूषेत त्यांनी संवादात्मक सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ विजया कोठेकर होत्या तर प्रमुख पाहुण्या सौ मनीषा दिग्रसकर उपस्थित होत्या.स्थानिक कार्यवाह किरणराव डुघरेकर , सुधीरराव चौधरी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणुन सौ वसुधा खारकर , सौ उज्वला धर्माधिकारी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा आष्टीकर , प्रास्ताविक व यादीवाचन सौ सुमेधा लोणीकर , पद्य विजय चौधरी, आभार सौ. वृषाली देशमुख, व्यासपीठ व्यवस्था सौ रेणुका बोठे व  सौ. मेघा गांजापुरकर यांनी पाहिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवक महेश सूर्यवंशी , संजीवनी रामपुरकर यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें