अ.भा.ग्रा.पंचायत समितीच्या आरोग्य समिती सदस्यपदी राधेश्याम वर्मा यांची नियुक्ती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

अ.भा.ग्रा.पंचायत समितीच्या आरोग्य समिती सदस्यपदी राधेश्याम वर्मा यांची नियुक्ती.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८सप्टेंबर २०१८

परभणी जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची बैठक दि.०७सप्टेंबर रोजी परभणी येथे पारपडली. यावेळी येथील राधेश्याम वर्मा याना परभणी जिल्हा ग्राहक पंचायत समितीच्या आरोग्य समिती पदी नियुक्त करण्यात आले. याबाबतची अधिकृत घोषणा व नियुक्तीपत्र अ.भा.ग्रा.पंचायत समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी राधेश्याम वर्मा यांना दिले.
परभणी येथील सिमा फंक्शन हॉल याठिकाणी घेन्यात आलेल्या या बैठकीस अ.भा.ग्र.पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास मोरे, जिल्हा संघटक धाराजी भुसारे, नवनियुक्त आरोग्य समिती जील्हाध्यक्ष के.बि.शिंदे, सोनपेठ तालुका अध्यक्ष किरन स्वामी, तालुका संघटक बळीराम काटे, राधेश्याम वर्मा आदिंसह अ. भा. ग्रा. पं. परभणी महानगर शाखा, तालुका शाखा परभणी, गंगाखेड , पाथरी, जिंतुर, पुर्णा, पालम व सेलु आदी  शाखेचे तालुका अध्यक्ष , तालुका संघटक  व सर्व सदस्य उपस्थित होते.
राधेश्याम वर्मा यांची जिल्हा आरोग्य समितीवर सदस्य निवड झाल्यबद्दल शहरातील अनेक नागरीक, सेवाभावी संस्था, संघटना व मित्रमंडळांकडून समाधान व्यक्त करून अभिनंदन करण्यात येत आहे. वर्मा यांच्या नियुक्ती मुळे सोनपेठ शहरातील जि.प.ची सलाईनवर असलेली आरोग्य सेवा सुधारली जाईल व रोग्यांना परळी, अंबाजोगाई किंवा सोनपेठ सोडून अन्य ठिकाणी जाऊन खर्चिक उपचार करण्याची वेळ येनार नाही असा आशावाद कांही जनांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें