ज्ञानाई ईंग्लीश स्कूलची दहीहंडी ऊत्साहात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

ज्ञानाई ईंग्लीश स्कूलची दहीहंडी ऊत्साहात.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान

सेलू: देवला (पु)  येथील ज्ञानाई ईंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी राधा कृष्ण या वेशभूषेने ऊपस्थीतांची मने वेधून घेतली. या वेळी सौ आरती दिक्षीत, सौ योगीता बोबडे, सौ सिमा डंख, कु आरोही देवगुंडे, कु ज्ञानाई खवणे, चि रुद्र राजे, यांनी कृष्ण चरित्रावर आधारित ।। गोविंदा आला रे आला। जरा मटकी संभाल ब्रीजबाला।। गौळणी व भक्तिगीत सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष/परीक्षक के बा विद्यालयाचे मा मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर, आणि प्रमुख पाहुणे श्री प्रकाशराव ऊक्कलगावकर हे होते. संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी दादा सेलूकर यांनी कृष्ण जन्मोत्सव संत ज्ञानेश्वर यांचा जन्मोत्सव आणि दहीहंडी गोपाल काला या विषयी मार्गदर्शन केले की प्रत्येकांनी सात्विक आहार घ्यावा या मध्ये दही, दुध, तुप, लोणी, ताक सेवन केल्याने  शरीर सदृढ आणि निरोगी राहून वैचारिक विकास आणि बुध्दीतेज होण्यास मदत होते. हे पदार्थ सेवन करण्यासाठी गायीचे पालन करने आत्यावश्यक आहे. श्री कृष्णांनी गोपालन करुन दही काल्याचे सेवन केले. या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम वैचारिक विकास महत्वाचा आहे. म्हणून पालकांनी बालकाला सकस, सात्विक, पौष्टिक आहार द्यावा आसे मार्गदर्शन केले. वेशभूषेत प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. बालकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडून सर्वांना प्रसाद व खाऊचे वाटप करण्यात आले. बालकाच्या वेशभूषेसाठी स्कूलच्या शिक्षीका सौ. सारीका जोशी, सौ सुवर्णा देवकते, सौ सिमा डंख, सौ आरती दिक्षीत, सौ योगीता बोबडे यांनी परिश्रम घेतले. प्रस्तावीक सौ जोशी आणि आभार सौ बोबडे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें