सेलू तालुका मैदानी स्पर्धा थाटात संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 16 सितंबर 2018

सेलू तालुका मैदानी स्पर्धा थाटात संपन्न.




सेलू प्रतिनिधी  शमशेर खान.
सेलू क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, गट शिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या.याप्रसंगी अशोक काकडे म्हणाले की शालेय क्रीडा स्पर्धेत तालुका स्तर हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. जास्तीत जास्त शाळा या स्तरात सहभागी होत असतात.यास्पर्धेतून खरा खेळाडू उदयास येतो, शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनबद्ध आयोजनाची प्रशंसा केली तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दि. 14 सप्टेंबर रोजी नूतन विद्यालय क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाली. धावणे बाबी, उडी बाबी, फेकी बाबी आणि रिले रेस यावर आधारित असलेली मैदानी स्पर्धेत एकूण 22 शाळां मधील 312 खेळाडू स्पर्धेत भाग घेतला. उदघाटन समारंभात अध्यक्ष म्हणून सेलू तालुका क्रीडा स्पर्धा उपाध्यक्ष तथा गटशिक्षणाधिकारी जयंत गाडे, ऊदघाटक म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अशोक काकडे, मुख्याध्यापक मधुकर काष्टे, नूतन प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बोथीकर,  पर्यवेक्षक अशोक गाजरे, मा मा सुर्वे संयोजक डी डी सोन्नेकर उपस्थित होते . तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन गट शिक्षणाधिकारी सेलू  जयंत गाडे यांनी केले.
प्रास्ताविक संयोजक डी डी सोन्नेकर यांनी आभार प्रशांत नाईक यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी  पंच म्हणून परभणी जिल्हा अॅथलेटिकस असोसिएशनचे कैलास टेहरे  अमोल नंद , निलेश काळंखे , गजानन भालेराव, कुणाल हणवते संतोष पवार, सतीश नावाडे, जुलाह खुददूस, दिलीप सुरवसे, महादेव खरात, राठोड, यांनी काम पाहिले.
सेलू तालुका मैदानी क्रीडा स्पर्धा ऊदघाटन प्रंसगी अशोक काकडे बांधकाम सभापती  (जिल्हा परिषद )  मा. जयंत गाडे गट शिक्षणाधिकारी मा. मा सुर्वे पर्यवेक्षक अशोक गाजरे, पंच प्रमुख कैलास टेहरे.डी.डी.सोन्नेकर, सय्यद नोमान, प्रंशात नाईक.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें