सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१६सप्टेंबर २०१८
सार्वजनिक ग्रंथालयांच्या विविध मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने दि.१९ सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात परभणी येथे होणाऱ्या अंदोलनास जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दि. १६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. येथील मुक्तेश्वर सार्वजनिक वाचनालयामध्ये झालेल्या ग्रंथालय कृती समितीच्या या अढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गर्जे यांनी सांगितले की, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांची सध्या तारेवरची कसरत सुरु आहे. तुटपुंज्या अनुदानावर चालनाऱ्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी अभावी अर्धपोटी जिवन जगावे लागत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व शेवाशर्ती लागू करण्यात यावी, नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता द्यावी, नियमीत दर्जाबदल सुरु करावा. अनुदानामध्येही तिप्पट वाढ करावी आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे असेही ते पुढे म्हणाले, बैठकीत परभणी येथील अंदोलनास सोनपेठ तालुक्यातील ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने जावे असे ठरले.
बैठकीस महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष
बाबासाहेब गर्जे, बबन कुरे, हनुमान कुरे, हनुमान जाधव, मुलगीर सर, धनंजय भिसेगांवकर, दिलीप मोकाशे, साहेबराव मोहिते, संजय ईंदुरकर, महादेव जाधव, तुकाराम कदम, रामेश्वर नरवाडे, भागवत जाधव आदीजन उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें