सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०४सप्टेंबर २०१८.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दि.३ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी शिवाजी कराड यांनी मोर्चेकऱ्यांकडून मागण्याचे निवेदन स्विकारले.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सरकार विरोधी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून शहरातील मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसील प्रांगणात मोर्चे कऱ्यांची भाषणे झाली. नंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. मंडळ अधिकारी शिवाजी कराड यांनी निवेदन स्विकारले.
दिलेल्या निवेदन गायरानपट्टे धारकाच्या नावे करण्यात यावेत, भिमा कोरेगाव दंगलीच्या मुख्य सूत्रधारास अटक करण्यात यावी, धनगर, मुस्लिम, मराठा समाजाचे आरक्षण, मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रश्न, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची अमलबजावणी करावी, अनुसूचित जाती नवबोद्ध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू कराव्यात, पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध कुशल कारागिरांना प्राधान्याने कर्ज वितरीत करावे, कृषी पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय व खादी ग्रामोद्योग कर्ज योजना मोहिम राबविण्यात यावी आदी मागण्यांंचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
निवेदनावर प्रा.डॉ.प्रवीण कनकुटे, श्रीमंत सावंत, रूस्तुम तुपसमींद्रे, रामभाऊ गालमोडे, अँड.अशोक पोटभरे, धम्मपाल सोनटक्के, रामेश्वर पंडित यासह असंख्य आंदोलकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें