आ. अब्दुल सत्तार अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात रवाना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

आ. अब्दुल सत्तार अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात रवाना.




सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.3, राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे विधिमंडळातील लोकलेखा समितीचा लंडन, नेदरलॅंन्ड व फ्रान्स या तीन देशांचा दौरा येत्या चार ते 13 सप्टेंबर दरम्यान, आयोजित केला आहे. या दौऱ्यात सिल्लोड - सोयगाव चे आ.अब्दुल सत्तार यांची निवड झाली आहे. रविवार ( दि.2 ) रोजी औरंगाबाद विमानतळावरून आ.अब्दुल सत्तार यादौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

  आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा तसेच पदुम सारख्या महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.2014 ला पुन्हा आमदार झाल्यानंतर विध्यमान सरकारमध्ये त्यांना विधिमंडळ सचिवालयातील लोकलेखा उपसमितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विधान भवनात शेतकरी व सामान्यांची रोखठोक बाजू मांडणारे नेते म्हणून आ.अब्दुल सत्तार यांची ओळख आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे विधिमंडळातील अभ्यासू आमदारांचा विविध देशांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. या दौऱ्यात विविध देशांच्या विधानमंडळाना तसेच संसदभवनांना (पार्लमेंट) भेटीचा कार्यक्रम असतो. यावर्षी राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा लंडन, नेदरलॅंन्ड व फ्रान्स या तीन देशांचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यासाठी विविध पक्षाचे दहा आमदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड - सोयगाव चे आमदार अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली आहे.
आ.अब्दुल सत्तार यांच्या परदेश दौऱ्यानिमित्त सिल्लोड - सोयगाव  विधानसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें