ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज .



◾ग्राहक पंचायतच्या बैठकीत डाॅ. विलास मोरे यांचे प्रतिपादन .


परभणी :- ग्राहकांचे शोषण थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांनी केले.

सिमा फंक्शन हाॅल परभणी येथे शुक्रवारी ता. 7 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटक धाराजी भुसारे, कारभारी शिंदे, बाबुराव शिंदे, शंकरराव गरूड, अब्दुल रहीम, योगीराज वाकुडे, सय्यद रफीक, राजश्री थोरात गुलाबराव शिंदे, मंचक देशमुख, रत्नमाला मोरे, शशीकला थोरात, कुसुम तोडकर, किशन खाडे,प्रकाश मेत्रे, ज्ञानेश्वर रोकडे, सुधाकर चव्हाण, सोपान टोले, पंकज निकम, शिवाजी आकात, अशोक कोपुलवार, रविंद्र चिटणिस, राजेंद्र कमळू, श्याम रणेर, अच्युत आहेरकर, रामेश्वर शिंदे, सतीश करंजे, बापुसाहेब पौळ, अरुणा शर्मा, जयश्री पौळ, शांतीलाल शर्मा, किरण स्वामी, बळीराम काळे, पांडूरंग शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डाॅ. मोरे म्हणाले की शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाने काम करणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले होते की खरे स्वातंत्र्य अगदी शेवटच्या तळागाळातल्या माणसाच्या झोपडीच्या दरवाज्यापाशी पोहोचेल तेव्हाच शोषणमुक्तचे नवे पर्व सुरू होईल. यावेळी तालुकास्तरावरील रिक्त असलेल्या पदावर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच जिल्हा आरोग्य समितीची स्थापना या बैठकीत करण्यात आली. नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्त पत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें