सोनपेठ येथे शांतता समितीची बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

सोनपेठ येथे शांतता समितीची बैठक संपन्न.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८सप्टेंबर २०१८

आगामी गणेशोत्सव, मोहरम व महालक्ष्मी सणा दरम्यान तालूक्यात व शहरात शांतता व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने आज दिनांक ०८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. याबैठकीस शहरातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, गणेश मंळाचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील व्यक्तींसह प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी डिवायएसपी सुधाकर रेड्डी हे होते तर महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी डीवायएसपी सुधाकर रेड्डी यांनी येणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम व महालक्ष्मी उत्सवानिमित्त नागरिकांनी दक्ष राहण्याचे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मूर्ती स्थापना झाल्यानंतर त्याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष काळजी घेणे बंधनकारक आहे असे आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी सांगितले. यावेळी पो.नि. सोपान शिरसाठ, भाजपाचे ज्येष्ठ रमाकांत जागीरदार, प्रभाकर शिरसाट, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम, गौस कुरेशी आदींनी मनोगत व्यक्त केले.
शांतता समितीच्या या बैठकीस विद्युत वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थिती नव्हता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें