सोनपेठ येथे विश्वकर्मा जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

सोनपेठ येथे विश्वकर्मा जयंती साजरी.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१७सप्टेंबर २०१८.
विश्वनिर्माता भगवान विश्वकर्मा यांची जयंती येथील सराफा बाजारातील सोन्याचे दागिने घडविणारे हिंदू मुस्लिम बंगाली  कारागीर पुरुष, महिला, मुले मुली आदिंनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावेळी राजू शी यांच्या हस्ते पंडित तापस गोस्वामी यांनी विधिवत भगवान विश्वकर्माच्या मुर्तीचे पुजन केले.
शहरात बंगाली कारागीर बांधव एकत्रित येऊन पहिल्यांदाच मुर्ती स्थापन करुन विश्वकर्मा जयंती साजरी करत आहेत. सदरील मुर्ती तीन दिवस एकाच ठिकाणी ठेवण्यात येऊन तीन दिवसा नंतर मुर्तीचे विसर्जन करण्यात येनार असल्याचे संजय पत्रा यांनी प्रस्तुत प्रतिनिधीसी बोलताना सांगितले.
यावेळी काशीनाथ दोलोई, संजय पत्रा, राजू शी, अनुप जाना, राजू दोलोई, हारू दोलोई, कार्तिक माझी, सुभाष माली, बबलू सरकार, मोहसिना सरकार, सुरज माझी, निवेदिता पत्रा, सुनिता शी आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें