भोकरदन प्रतिनिधी : श्री छञपती संभाजी मा व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करून हुतात्मा च्या आठवणी ना उजाळा देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य संजय पैठणकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर सह शिक्षक श्री दिनकर ठाकरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तिर्थ, गोविंद भाई श्राॅफ,यांच्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील कार्यां बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ही आपले विचार मांडले. यावेळी संरपच शिलाताई हरिदास वेलदोडे,माजी संरपच विलासराव सावंत,प्रकाश पा सावंत,माजी सरपंच भगवान चिकटे,रामेश्वर चिकटे,नामदेव पा चिकटे,हरिदास वेलदोडे,सहशिक्षक कैलास फुके,प्रतापसिंह पाटील,विजय कल्याणकर,राजेंद्र डेढवाल,सौ उषाताई खैरे मॅडम,सौ कमलताई सोनवणे मॅडम,जनार्दन सुरासे,मुनीर भंडारे,हरिदास गव्हाड,सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें