शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काँग्रेसच्या आमरण उपोषण उपोषणाची लेखी आश्वासन मिळाल्याने यशस्वी सांगता उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासन हादरले सिल्लोड . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काँग्रेसच्या आमरण उपोषण उपोषणाची लेखी आश्वासन मिळाल्याने यशस्वी सांगता उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासन हादरले सिल्लोड .




 तिसऱ्या दिवशी १२ उपोषकर्त्यांची प्रकृती खालावली चौघेजण गंभीर.


शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.३१ ) सिल्लोड व सोयगाव  तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सिल्लोडच्या तहसिल समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातील चौघांची तब्येत अधिक गंभीर झाल्याने प्रशासन हादरून गेले होते. उपोषणार्थ्यांनी सुरू असलेले आमरण उपोषण सोडावे यासाठी प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यागेल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नाला तिसऱ्या दिवशी यश आले.


सिल्लोड तहसिल कार्यालया समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवीदास पाटील लोखंडे व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करावे, तसेच अल्पशा व लहरी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एका वर्षाची नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर सोळा दिवस साखळी उपोषण केल्यावरही प्रशासनाकडून कुठल्या प्रकारे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समज उपोषणकर्त्यांचा झाल्याने बुधवार दि.२९ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. वरील मागण्यांसाठी २२ उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवसापासूनच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत गेली दि.३१ शुक्रवार रोजी तिसऱ्या दिवशी १२ उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यातही फहिम पठाण, सखाराम अहिरे, निजाम पठाण व शेख सलीम हुसेन यांची अधिकच खराब होऊन गंभीर स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनच तर हादरलेच होते, सामान्य नागरिकांमध्ये उपोषणकर्त्यांच्या बद्दल चिंता व्यक्त होत होती.
आमरण उपोषणकर्त्यांमध्ये तिसऱ्या दिवशी दि.३१ शुक्रवार रोजी १२ आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे.  फहिम पठाण, सखाराम अहिरे, निजाम पठाण व शेख सलीम हुसेन या चौघांना रक्तदाब, मधुमेह व तापाने फंफणल्याने प्रचंड त्रास होऊन प्रकृती अति गंभीर बनली होती. एकही उपोषणकर्ता उपचार घेण्यास तयार नसल्याने प्रशासनाची मोठी गोची झाली होती.

प्रशासनाकडून तातडीची समनव्य चर्चा होऊन उपोषणकर्त्यांचे आमरण उपोषण सोडण्यासाठी योग्य पावले उचलल्या गेलीत. जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा करून दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना एका वर्षाची नुकसान भरपाई देणे तसेच शेतकऱ्यांच्या पीक परिस्थितीचे पंचनामे करणे आदी मागण्यांच्या बाबतीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घटणार असा अहवाल शासनाला दिलेला आहे. शासनाच्या २०१७ व २८ जून २०१८ सुधारीत नवीन  अध्यादेश प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रियाही सुरू असून जिल्हाधिकारी अथवा शासनाकडून आदेश प्राप्त होताच आठ दिवसांत पंचनामे केले जातील असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्याना प्रशासनाकडून देण्यात आल्याने उपोषणाची यशस्वी सांगता उपोषणकर्त्याना रस देऊन उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, प्रभारी तहसिलदार संजय सोनवणे, पोनी भगीरथ देशमुख व तालुका कृषिअधिकारी दीपक गवळी यांच्या हस्ते उपोषकर्त्याना रस जलपान देऊन उपोषण सोडविण्यात आले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे यांच्यासह अमित आरके, अकील देशमुख, राजेंद्र बन्सोड, हाजी मो.हनिफ, जगन्नाथ कुदळ, रुपेश जैस्वाल, जमीर मुलतानी, रघुनाथ कल्याणकर, विठ्ठल जैवळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, निजाम पठाण, विठ्ठल सपकाळ, फहिम पठाण, लक्ष्मण कल्याणकर, शेख सलीम हुसेन, रवी आरके, रईस पठाण मुजावर, कुणाल सहारे, मनोहर आरके, व शेख बाबर बागवान, जगन्नाथ कुदळ यांचा समावेश असून निजाम पठाण, सखाराम अहिरे, फईम पठाण, शेख सलीम हुसेन या उपोषणकर्त्यांची प्रकृती अधिक खालावली गेली होती. या चौघांची प्रकृती रात्रीतून चिंताजनक झाल्याने सारेच प्रशासन हादरून गेले होते उपोषणाची सांगता व्हावी यासाठी बैठक - चर्चासत्र धावपळ होऊन अखेर मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन उपोषणाची यशस्वी सांगता दि.३१ शुक्रवार रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान करण्यात आली.प्रकृती गंभीर असलेल्या उपोषकर्त्याना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले उपोषणाची यशस्वी सांगता  - नगराध्यक्ष अब्दुल समीर=शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत प्रशंसानाने तिसऱ्या दिवशी का होईना गंभीरपणे दखल घेतली व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपोषणर्थिनी मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन जनांदोलनाची यशस्वीपणे सांगता केली. शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने ही आता आर पारची न्याय हक्काची लढाई होती. शेतकऱ्यांच्या हिताची लढाई यशस्वीपणे जिंकल्याचा आनंद व्यक्त केले. पोलीस प्रशासन, महसूल व आरोग्य विभागाचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार व्यक्त केले.
जगाचा पोशिंदयाचा लढा यशस्वी लढा जिंकल्याचा आनंद मनाला समाधान असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें