सोनपेठ (राजेश खेडकर)दि.३१ऑगस्ट २०१८
शहरातील न.प. हद्दीतील दसरा रोड समोरील मुस्लीम कब्रस्थानात व परिसरात टाकलेला कचरा नगर परिषदेने साफ करावा अशा मागणीचे निवेदन आज मुस्लीम युवकांनी मुख्याधिकाऱ्यांन दिले आहे.
मुख्याधिकारी न.प.सोनपेठ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेच्या हद्दीत गट क्रमांक०३ मध्ये दसरा रोड लगत येथील मुस्लीम समाजाची स्मशानभूमी आहे. या परिसरात नगर परिषदेने गावातील कचरा एकत्रीत करून या परिसरात आणून टाकला आहे. एकिकडे केंद्र व राज्य शासन जनतेचे आरोग्य जपन्यासाठी स्वच्छता मोहीम आखून ग्राम स्वच्छतेसाठी लाखोंचा निधी खर्च करीत आहे, मात्र न.प. शहरालगत असलेल्या कब्रस्थान व परिसरात गावातील कचरा टाकत आहे. मुस्लीम समाजाच्या भावनांची दखल घेवून सदरील कचरा साफ करून संपूर्ण कब्रस्थान परिसर स्वच्छ व सुंदर करावा अशी विनंती निवेदनात केली आहे.
निवेदनावर शब्बीर बागवान, मुस्ताक बागवान, आजीमोद्दिन बागवान, सत्तार बागवान, बाबा बागवान, बाबा चांद बागवान, महमद बागवान, इरफान बागवान, इनुस बागवान, मज्जीद बागवान, बाबाभाई बागवान, जमीर चांद बागवान, सलीम अन्सारी, फाज्लोद्दिन बागवान, मगदम बागवान, आमेर बागवान, सोहेल बागवान, सद्दाम हुसेन, सामियोद्दिन काजी, राजू सौदागर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें