जि प सदस्य राम पाटील यांचा पुढाकार.
सेलू प्रतिनिधी शमशेर खान
तालुक्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळा हिस्सी येथील वर्ग खोल्याचे झालेली दुरावस्था बघून जिल्हा परिषद सदस्य तथा जि प गटनेते राम पाटील यांच्या पुढाकारातून पाच लाखांचा निधी शाळेच्या वर्गखोल्या साठी देण्यात आला व त्या कामाचे शुभारंभ गुरुवार 2 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आला यावेळी शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख तथा जि प गटनेते राम नाना पाटील गावचे सरपंच दिपक गोरे ह भ प जयराम महाराज तांगडे मुख्याध्यापक मोगल सर माजी सभापती संतोष गात प्रत्रकार ज्ञानेश्वर गायकवाड माजी सरपंच मुरलीधर गोरे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर मगर बाळू मगर मधुकर कवडे वशिष्ठ गोरे दत्ता कवडे व इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी राम नाना पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या तसेच जिल्हा परिषदेची शिक्षक भरती याकडे जातीने लक्ष घालू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता वाढवण्याचे काम करू असे यावेळी बोलताना ते म्हणाले यामुळे गावातील ग्रामस्थांनी मात्र राम पाटील यांचे भाषण ऐकून ते आनंदी झाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें