कृषी विभागाचे कृषी विक्रेत्यांवर नियंत्रण नाही.बॉण्ड अळीच्या उपाययोजनेत कृषी विभागाचे उदासीनता. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

कृषी विभागाचे कृषी विक्रेत्यांवर नियंत्रण नाही.बॉण्ड अळीच्या उपाययोजनेत कृषी विभागाचे उदासीनता.



--निकृष्ट औषधे विकून शेतकऱ्यांची सर्रास लूट.


--तातडीने कारवाईची दबाव गटाची मागणी.



सेलू(प्रतिनिधी)शमशेर खान

सेलू तालुक्यासह संबंध जिल्ह्यात बियाणे व औषधे विक्रेत्यांवर कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने निकृष्ट दर्जाचे औषधे विक्री करून अक्षरश शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरी आहे.याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत कारवाई करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाने आज गुरूवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
परभणी जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेणारा जिल्हा आहे.बी.टी.बियाणांचा वापर सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही वर्षे कापसावर रोगाच्या प्रदूर्भावाचे प्रमाण कमी होते.मात्र गेल्या काही वर्षांपासून कापसावर मोठ्या प्रमाणावर बॉण्ड अळी चा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.प्रचंड प्रमाणावर नुजसं झाले आहे.कदाचित अप्रमाणित बियाणे,तसच विक्रेत्यांवर कृषी विभागाचे नियंत्रण नसणे यामुळे शेतकरी पूर्ण नागवला जात आहे.कृषी विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे व औषधांची विक्री होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावर कृषी विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही.पूर्वी बॉण्ड अळी साधारण पीक 90 दिवसांचे झाल्यावर सुरू झाली,परंतु यावर्षी 30 ते 35 दिवसातच बॉण्ड अळी चा प्रादुर्भाव कापसावर मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग असमर्थ ठरत आहे.काही औषधी फवारणी करण्याबाबत सल्ला कृषी विभागाच्या वतीने दिला जात आहे.परंतु सदर औषधांच्या फवारणीने बॉण्ड अळी किती प्रमाणात आटोक्यात येईल याबाबत संशय आहे.यासाठी संशोधकांकडून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष समूहांमध्ये भेटी घेऊन मार्गदर्शन,सल्ला शेतकऱ्यांना लवकर मिल्ने आवश्यक आहे.मात्र जिल्हा कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी केवळ वेगवेगळे वेळापत्रक छापून त्याचे वाटप करीत आहेत.जे अत्यंत चुकीचे व बेजबाबदारपणाचे आहे.
यामुळे बॉण्ड अळी मुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने योग्य औषधांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करून योग्य औषधे सुचवावीत व बोगस बियाणे ,निकृष्ट औषधे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी दबवगटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.या निवेदनावर ऍड.श्रीकांत वाईकर,ऍड.टी.ए.चव्हाण,ओमप्रकाश चव्हाळ,ऍड.रामेश्वर शेवाळे,ऍड.दीपक भूकतर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें