'त्या' मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आ.संतोष दानवे यांच्या कडून चार लाखाची आर्थिक मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

'त्या' मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आ.संतोष दानवे यांच्या कडून चार लाखाची आर्थिक मदत.



पूर्णा नदीच्या डोहात बुडून झाला होता मृत्यू !


भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील मेरखेडा येथील रहिवासी वसंता रामराव क्षीरसागर यांचा काही दिवसांपूर्वी पूर्णा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबातील कर्ता पुरुष असा अचानक गेल्याने क्षीरसागर कुटुंबावर शोककळा पसरली होती. त्यांना आधार देण्यासाठी भोकरदन-जाफराबाद मतदार संघाचे युवा आमदार यांनी नैसर्गिक आपत्ती मधून कै.वसंता रामराव क्षीरसागर यांच्या वारसास अलकाबाई क्षीरसागर यांना रुपये चार लाखाचा धनादेश देऊन सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी तहसीलदार श्रीमती कोल्हे मॅडम, जि.प.सदस्य डॉ.चंद्रकांत साबळे, मा.पं.स.सदस्य रमेश मुरकुटे, रामेश्वर कारखान्याचे संचालक मधुकर तांबडे, बाबासाहेब मुरकुटे, पंडित जाधव व इतर कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें