तालूकास्तरीय स्पर्धेत लालबहादुर शास्री विद्यालयाची विद्यार्थींनी कु.यशोदा हाके हीचे यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

तालूकास्तरीय स्पर्धेत लालबहादुर शास्री विद्यालयाची विद्यार्थींनी कु.यशोदा हाके हीचे यश.


धावने या स्पर्धेत वेगवेगळ्या तीन प्रकारात नेत्रदिप कामगीरी.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२४ऑगस्ट २०१८
 सोनपेठ येथील व्हिजन स्कुलमध्ये अयोजीत तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत लासीना येथील लालबहादुर शास्री विद्यालयाची विद्यार्थींनी कु.यशोदा हाके हीने धावने यास्पर्धेत वेगवेगळ्या तीन प्रकारात नेत्रदिप कामगीरी करुन यश संपादन केले असून, या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
      तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्यातील आनेक शाळांनी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणधिकारी शौकत पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य व्ही. आर. दुकळे, श्रावणकुमार, सुरज गायकवाड, शिवमल्हार वाघे, राधेशाम वर्मा, किरण स्वामी आदींंची उपस्थित होती. धावने, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, उंच उडी, लांब उडी यासह अन्य क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. तालुका स्तरीय स्पर्धेच्या अधिन राहुन व नियमांचे पालन करुन लासीना येथील लालबहादुर शास्री विद्यालयाची विद्यार्थींनी कु. यशोदा अशोक हाके हिने १४ वर्षे वयोगटात १०० मिटर २००मिटर व ४०० मिटर धावने यास्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदिप कामगीरी दाखवून विशेष प्राविण्य मिळवले असुन, जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.परांडे, क्रिडा शिक्षक प्रमोद मोरे, मुंजाजी डुकरे, भगवान पैठणे, प्रकाश सोळंके, सुभाष मकने, दत्ता परतवाड, गणेश भंडे, सुग्रीव दाढेल बळीराम कदम, देवानंद निरस यांच्यासह सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें