सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२९ऑगस्ट २०१८
शहरातील शुभ कल्याण मल्टिस्टेट क्रेडिट को-अॉप. सोसायटी या पतसंस्थेने दाम दुपटीचे आमिष दाखवून तालुक्यातील अनेक व्यक्तींकडून लाखो रुपयांंची ठेव स्विकारली. सुरूवातीस कांही दिवस नियमित परतावा दिल्यानंतर ठेवी व व्याज परत करण्यास टाळाटाळ होऊ लागली. मुदत संपल्यानंतर ठेवीदार आपली रक्कम काढून घेण्यासाठी सदर पतसंस्थेत गेले असता शाखाधिकारी उमेश यादव यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. कालांतराने शुभ कल्याण मल्टिस्टेटचे चेअरमन व संचालक मंडळावर ठिकठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल होण्याचे सत्र चालू झाले. यामुळे शहरातील ठेवीदारांनाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आज दि.२९ अॉगस्ट रोजी लक्ष्मीबाई महाजन, ईश्वर मुस्तापुरे, वैजनाथ चौंडे, प्रणिता वांकर, नवनाथ भोसले, ललिता परळकर आणि सरस्वती रासूरे या सात ठेवीदारांनी स्वतंत्ररित्या सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत.
पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात सोनपेठ येथील शुभ कल्याण मल्टिस्टेट कॉ-अॉप.क्रेडिट सोसा. शाखा सोनपेठ या पतसंस्थेत वेगवेगळ्या तारखेला रक्कम मुदत ठेवी जमा केली होती. मुदत संपल्यानंतर जमा रक्कम परत करण्यास शाखाधिकारी उमेश मंचक यादव यांंनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. पैसाची गरज असतांनाही ठेवीदारांना मुदत वाढवून देतो अशी दिशाभूल केली. शाखाधिकारी व संस्थाध्यक्ष यानी संगनमत करून सोनपेठ येथील शाखा बंद करून ठेवीदारांची फसवणूक करून पोबारा केला अाहे असे नमूूद करून दोषींविरूद्ध गुन्हा नोंंद करून जमा रक्कम देण्यात यावी असे म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें