( शेख कलीम )
सिल्लोड प्रतिनिधी:
( दि२९ )सिल्लोड - सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षाची नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शासनाने व प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने पक्षाने अखेर साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेतला असून बुधवार दि.२९ ऑगस्ट २०१८ पासून सिल्लोड तहसिल कार्यालया समोर तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणा सुरू झालेले आहे.
सिल्लोड - सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना एका वर्षाच्या शेती हंगामाची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात १३ ऑगस्ट २०१८ पासून सिल्लोड तहसिल कार्यालया समोर सुरू असलेल्या साखळी उपोषण उपोषण तब्बल १६ दिवस करण्यात आले. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाकडून कुठलेच पाऊल उचलले गेलेले नसल्याने शासन उपोषणकर्त्यांचा अंत पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही तालुक्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अखेर सिल्लोड तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणास बुधवार दि.२९ ऑगस्ट २०१८ पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेल्या या आमरण उपोषणात पहिल्या दिवशी २५ पदाधिकारी सहभागी झालेले आहे. उपोषणकर्त्यांना पहिल्या दिवशी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यानी दिवसभर उपोषणात सहभागी होऊन समर्थन दिले आहे.
आमरण उपोषणकर्त्यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष अब्दुल समीर, देविदास लोखंडे, विठ्ठलराव सपकाळ, रईस मुजावर पठाण, अमित आरके, सलिम हुसैन, रुपेश जैस्वाल, बाबर बागवान, राजु बन्सोड, निजाम पठाण, लक्ष्मण कल्याणकर, हाजी मोहम्मद हनिफ, कुणाल सहारे, विठ्ठल जैवळ, जमीर मुल्तानी, सखाराम अहिरे, अकिल देशमुख, मच्छिंद्र दांडगे, मनोहर आरके, रघुनाथ कल्याणकर, जगन्नाथ कुदळ, विठ्ठल खरात, फईम पठाण, रवि आरके, आदींचा आमरण उपोषणाला बसणाऱ्यात समावेश आहे.
चौकट : -------------
* शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे सरकार - नगराध्यक्ष अब्दुल समीर
काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने, रस्ता रोको, धरणे सातत्याने असे जनांदोलन केले जात आहे. परंतु भाजपाच्या नेतृत्वातील या सरकारला शेतकऱ्यांशी काहीच घेणे देणे नाही. अदानी अंबानी सारख्या मूठभर उधोगपतींना मदत करणारे व निरव ललित मोदी, माल्या देशाला बुडविणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे.
शासन व प्रशासनाने कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषणकर्त्यांच्या रास्त मागण्यांचा तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा व मागण्या मान्य कराव्यात, मात्र उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आमरण उपोषणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना घडल्यास याची सर्वस्व जवाबदारी प्रशासन व शासनावर राहील असा ईशारा निवेदनातून आम्ही दिलेला आहे.
आमरण उपोषकर्त्यांच्या समर्थनार्थ एक दिवस उपोषण करून पाठिंबा देणाऱ्यात दुर्गाताई पवार, प्रा.मन्सूर कादरी, राजु गौर, कैसर आझाद, शेख बाबर, कौतिकराव मोरे, विश्वासराव दाभाडे, राजुमिया देशमुख, अली चाऊस, कौतिकराव बडक, रफिक देशमुख, मधुकरराव गवळी, शेख मिया, मतीन देशमुख, संदीप राऊत, सलमान बागवान, सचिन गोरे, जयराम चिंचपुरे, मिर्झा अफजलबेग, रोहिदास पवार, संजय मुरकुटे, अनिसखा पठाण, धैर्यशील तायडे, रामकृष्ण काकडे, मानसिंग राजपूत, मुश्ताक देशमुख, रामभाऊ झोन्ड, गणेश डकले, अशोक पालोदकर, राजु साठे, नामदेव खंडागळे, भावराव दुधे, दिपक वाघ, शंकर नरवाडे, रामराव इंगळे, सुखदेव जिवरग, समाधान साळवे, सलीम पठाण, शांतीलाल अग्रवाल, लक्ष्मणराव तायडे, प्रभू भोकरे, विनायकराव दाभाडे, सलमान खान, धोंडीराम जैवळ, सय्यद रहीम, अशोक दाभाडे, शिवाजी शेळके, रामदास दाभाडे आदींसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यानी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी दिवसभर एक दिवसाचे उपोषण करून आमरण उपोषणाचे समर्थन करून पाठिंबा दिला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें