बदनापूर(प्रतिनिधी) अजहर शेख
बदनापूर शहारात 2003 पासून चालू असलेली एकमेव उर्दू हायस्कूल जे आज प्रायमरी ते ज्युनिअर कॉलेज पर्यंत चालू आहे.ही शाळा शैक्षणिक व भौतिक सुविधाकडे प्रगती ऐवजी अधोगतिकडे वाटचाल चालू आहे.साई शिक्षण प्रसारक मंडळ करळगाव तालुका घनसावंगी द्वारा संचालित ही शाळा शिक्षण विभागाच्या दुर्लक्षेमुळे अनित्य परिस्थितीत चालू आहे.
मौलाना आझाद उर्दू शाळा चार खोलाच्या चिखलमय बोलीत चालत आहे.ही शाळा शोधून काढण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याचा दमछाट होतच असेल या चार खोल्याच्या शाळेत 1 ली पासून 12वी प्रयन्त वर्ग भरतात. याची उपाय योजना मुख्याध्यापक व संस्था चालकाकडे कोणती आहे हे आज पर्यंत कळू शकले नाही .भौतिक सुविधांच्या नावाखाली शौचालय ,क्रीडांगणे, मुलांसाठी बसण्यासाठी जागा, शिक्षकांसाठी जागा कुठे आहे हे शोधावी लागेल तसेच शैक्षणिक हाल याच्या पेक्षा वेगळे नाही.मुख्यदयापक कोण आहे यांचा नाव रजिस्टर पटावर भेटत आहे पण ते शाळेत कधीच भेटत नाही माहीती अशी आहे की त्या संस्थाचालकांची अर्धांगिनी आहे.
मौलाना आझाद उर्दू शाळा त्याच खोलयामध्ये या संस्थेचे क्रांती ज्युनिअर कॉलेज ही चालत आहे.या चार खोल्याच्या शाळेमध्ये शाळा व कॉलेज कशी चालत असेल याची आम्ही कल्पनाच करू शकतो या शाळे बद्दल समाजात राग वावरत आहे उर्दू माध्यम मध्ये शिकणाऱ्या मुले -मुली नाईलाजाने प्रवेश घेतात ज्यांना शौचालय नसल्यामुळे खूप हाल होत आहे.या सगळ्या बाबीकडे संस्थाचालक ,मुख्याध्यापकांनी पाठ फिरवली आहे कमालीची बाब ही आहे की शिक्षण विभाग याबाबीकडे का दुर्लक्ष करीत आहे हे कळत नाही
मुद्दे
1) शैक्षणिक विभाग या शाळेतील मुख्याध्यापकाला शोधून काढणार का?
२)विध्यार्थ्यांना शौचालय साठी खुल्या मैदानावर जावं लागत आहे
3)एका बाकड्यावर चार चार विध्यार्थ्यां बसतात
4)जनावरांना ठोसल्यावणी विध्यार्थी ठोसणे बंद करणार
5)अल्पसंख्याक विभागा कडून दोन लाख अनुदान ,उभारलेली सुसज्ज वाचनालय आणि संगणक लॅब गेली कुठे?
6)अल्पसंख्याक विभाकडून उचललेले भौतिक सुविधांसाठी अनुदानाची विल्हेवाट लावली कशी?
7)शाळेच्या नावाची फलक बोर्डे कुठे बघायला मिळेल
ह्या फार मोठी कोंडी आहे.
बदनापूर शहरातील एकमेव उर्दू शाळेत भौतिक सुविधेकडे कानाडोळा केला आहे अजून विध्यार्थ्यांना कितीही त्रास सहन करावा लागणार आहे हे समजत नाही.तसेच या शाळेकडे शैक्षणिक विभाग लक्ष देणार का अशी चर्चा सुजज्ञ लोकांन मध्ये जोर धरत आहे.
आज गावातील लोकांनी उर्दू शाळेची शैक्षणिक दुर्दशे ला कंटाळून शाळेला कुलुप लावले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें