३२ आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली,कामकाज समाधानकारक नसल्याचा ठपका. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

३२ आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली,कामकाज समाधानकारक नसल्याचा ठपका.


जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या सूचनेप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कारवाई.



सेलू प्रतिनिधी
 पठाण शमशेर खान
                    ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधान कारक नसल्याचा ठपका ठेवत वालूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४ उपकेंद्रातील आरोग्यसेवीका व  आरोग्य सेवक यांची माहे जुलै २०१८ ची वार्षिक वेतनवाढ वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. यु.निलंगेकर  यांनी रोखली आहे.तर देऊळगाव गात प्रा.आ.केंद्रातंर्गत १८ कर्मचाऱ्यांरी अशा तालुक्यात ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे.
                  ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांच्याकडून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे कामकाज तत्पर व्हावा असं नियोजन आरोग्य विभागाने केले होते .मात्र मानव विकास योजनेअंतर्गत बुडीत मजुरी योजना तसेच जननी सुरक्षा योजना व पंतप्रधान मातृत्व या योजनेतील लाभार्थ्यांची माहिती वेळेत आँनलाईन  सादर न केल्यामुळे असे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. आँनलाईन माहिती वेळेवर सादर न करण्याचा ठपका आरोग्यसेवीका व  आरोग्यसेवक व सहाय्यक यांच्यावर ठेवत ज्यांचे  कामकाज  समाधानकारक नाही अशा कर्मचाऱ्यांना जुलै २०१८ ची वार्षिक वेतनवाढ देऊ नये अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वालूर प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.यु.निलंगेकर  यांनी  देवगांवफाटा ,बोरकिनी,गिरगाव, सावंगी ,चिकलठाणा ,मोरेगांव ,कुपटा ,डुघरा ,सोन्ना ,सेलवाडी ,राव्हा ,कान्हड ,सिमणगांव ,पिंपरी येथील १४ उपकेंद्रातील आरोग्यसेवीका ,आरोग्यसेवक,व सहाय्यक  यांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत.
            सेलू तालुक्यात वालूर व देऊळगाव गात असे दोन प्रा.आ.केंद्र असुन वालूर अंतर्गत १४ तर देऊळगाव गात अंतर्गत १८ अशा ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 मुख्यालयी राहण्याचे वावडे.........
            आरोग्य उपकेंद्रात महिलांची  प्रसुतीसह ईतर आरोग्य उपचार वेळेवर मिळावेत यासाठी आरोग्यसेवीका व आरोग्य सेवक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आसतांना बहुतांश आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत एव्हढेच नव्हेतर चार- चार दिवस गावात फिरकत नाही मात्र स्थानिक अधिकार्यांकडून या बाबीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते या प्रकाराकडेही वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
   

 कामात सुधारणा व्हावी. ......
               मुख्यालयी राहणे व दिलेले काम वेळेत पुर्ण करणे यासाठी वारंवार लेखी सुचना आरोग्य कर्मचारी यांना दिलेल्या आहेत .असे आसतांना ही कामकाज समाधानकारक नसल्याचा ठपका ठेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांच्या सुचने प्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी यांची  वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. कामात सुधारणा होणेसाठी हि कारवाई आहे आसा दुजोरा सेलू तालुका आरोग्य अधिकारी आर.एम.सोनवणे यांनी दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें