सेलु(प्रतिनिधी): राज्यभर शासकिय व निम्मशासकिय खाजगी अनुदानित विभागातील कर्मचारी हे संपावर गेल्याने शासकिय कार्यालयासह निम्मशासकिय कार्यालयात शुकशुकाट दिसत होता.
मंगळवार 7 रोजी तहसिल कार्यालय परिसर नुतन महाविद्यालय परिसरात कर्मचारी हे संपात सहभागी झाले होते. राज्यातील शासकिय, निम्मशासकिय, खाजगी अनुदानित संस्थेतील क व ड संवर्गातील कर्मचारी यांनी आपल्या मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसल्याने तहसिल, पंचायत समिती, भुमि अभिलेख, कृषी सह खाजगी अनुदानित शिक्षण संस्थेतील कामकाज दिवसभर झाले नसल्याने नागरीकांची तारांबळ झाली. राज्यातील विविध कर्मचारी संघटेनेच्या वतीने तिन दिवस संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये सातवा वेतन आयोग लागु करण्यात यावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व थकबाकी देण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा, महिला कर्मचारी यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा लागु करावी,अनुकंपावर सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशा विविध मागण्यासाठी संप करण्यात येत आहे.या संपात राज्यातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें