सेलू:प्रतिनिधी
येथील गायत्रीनगर मधिल रहिवासी परमेश्वर
लक्ष्मण शिंदे वय ३२वर्षे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दि.७ऑगस्ट रोजी सकाळी ११-५० वाजता सेलू-पाथरी रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात निधन झाले.
मयत परमेश्वर शिंदे येथे मजूरचे काम करत आसत घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचे निधन झाल्याचे घोषीत केले. शवविच्छेदना नंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत शिंदे यांच्या पश्चात वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची फिर्याद रामेश्वर शिंदे यांनी दिल्यावरून सेलू पोलीस ठाण्यात. ४७/१८ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीअसून पुढिल तपास बीट जमादार उद्धव लाड, उमेश बारहाते , हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें