सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्या करिता ९ऑगस्ट गुरुवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आव्हान मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सेलू येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत उपस्थित शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी सेलू तालुक्यात 9 ऑगस्ट रोजी करण्यात येत असलेला अतिशय शांततेत व कुठल्याही समाजाला नागरिकाला शासकीय मालमत्तेला हानी पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे असे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले
याप्रसंगी जि प गटनेते राम खराबे पाटील डॉ संजय रोडगे छगन शेरे मिलिंद सावंत अशोक अंभोरे दिलीप डासाळकर मोहन बोराडे आदींनी भावना व्यक्त करून शांतता राखण्याचे आव्हान यावेळी केले
महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्वरूप कंकाळ व पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे यांनी कुठेही शांततेला गालबोट न लागता आंदोलन यशस्वी करावे असे आव्हान केले या बैठकीस सर्व समाजाचे शहरातील नागरिक पत्रकार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें