सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२७ऑगस्ट२०१८
तालुक्यातील विटा (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु..प.प्रा.शा.व शाळेत आज इयत्ता कु.सानिया जाकेर शेख हिचा वाढदिवस शाळेत नुकताच साजरा करण्यात अाला. या प्रसंगाचे औचित्य साधून तिने शाले ग्रंथालयास चार पुस्तके भेट दिली.
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतून शाळेत ग्रंथरूपी वाढदिवस साजरे होत आहेत. शाळेच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी चि.इम्रान पठाण व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.राधा काळे हिने शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक शेख, सहशिक्षक होसनाळे, बनाळे, व शालेय व्यवस्थापन समिती विटा(खु) यांनीही तिला शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें