जिंतूर प्रतिनिधी,
परभणी येथील राज वैद्द सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून दिला जाणारा एकत्मता गौरव पुरस्कार जिंतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले फौजदार सुरेश नरवडे यांना देण्यात आला आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी बजवनार्या व्यक्तीस दरवर्षी एकत्मता गौरव,धन्वंतरी गौरव,महाराष्ट्र शिक्षणरत्न पुरस्कार हा राज वैद्द सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देण्यात येतो. पोलीस उपनिरीक्षक सुरेश नरवडे यांच्या जिंतूर येथील पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना २६ औगस्ट, रविवार रोजी, सकाळी ११ वाजता परभणी येथील बी.रघुनाथ सभागृह येथे परभणीच्या महापौर मीनाताई वरपुडकर,शिक्षक आमदार विक्रम काळे व सिने कलावंत यांच्या हस्ते एकत्मता गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घीर्डीकर,पो.नि.आमले, स.पो.नि.दत्ता कानगुले,सय्यद अनीसा,शेख अहमद, तथा पोलीस प्रशासन,मित्र परिवार व नातेवाईकाकडुन त्यांचे कौतुक केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें