ह.भ.प. कु.भक्ती कुलकर्णी यांचे प्रवचन सोहळ्यात विवेचन.
सेलू प्रतिनिधी(समशेर खान)
बालपणी माता - पित्यांना देहांत, वाट्याला आलेली अवेहलना ,समाजाचा जीवघेणा त्रास, आशा अनेक संघर्षाच्या झळा सोसत, जगाच्या कल्याणाचा ध्यास घेणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली महाराज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. कु. भक्ति कुलकर्णी यांनी केले आहे. त्या २६ आँगष्ट रोजी श्री केशवराज बाबासाहेब मंदिर येथील आयोजीत ज्ञानेश्वरांनी प्रवचन सोहोळ्याचे १५ वे पुष्प गुंफतांना बोलत होत्या.
या वेळी आशिर्वचणपर बोलताना त्या म्हणाल्या की, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या तोंडुन वेद बोलविले, एव्हढेच नव्हे तर पाठीवर मांडे भाजुन भांवडाना दिले. व मृत माणसाला जिवंत करून त्याच्या हातून पवित्र ग्रंथाचे लिखान करून घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या कल्याणाचा पाया रचला . त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यात आळंदीकरांसह पैठणकर ढसाढसा रडले असे संत ज्ञानेश्वर माउलींच्या आत्मचरित्राचे दर्शन ह.भ.प.कु.भक्ती अनंतराव कुलकर्णी बिड यांनी सभागृहात दिले अणि अक्षरशः श्रोत्यांचे डोळे पानवले.
तसेच निर्जीव भिंत चालूनही आळंदीकराना संत ज्ञानेश्वर माऊलीची दया आली नाही. त्या कठिण कलावधीत जाणीवजागृती करीत कठिण परीस्थीतीत सर्व मानवाच्या कल्यांनासाठी माऊलींनी अमृततुल्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे बालपण व वार्धाक्य अवस्थेत नामस्मरण होत नाही तर तरूणपणात एकदा तरी ज्ञानेश्वरी चे पारायण करावे.यामधुन जिवन जगण्याचा मार्ग व उर्जा मिळाल्या शिवाय राहत नाही असे विवेचनात ह.भ. प.कु. कुलकर्णी यांनी सांगितले.
मानवाला नरदेह हा किरायाने मिळाला आहे. मुदत संपली की प्रत्येकाला हा देह सोडून जावे लागणार आहे.त्यामुळे वेळेचा सदउपयोग करून जिवन मुक्त करावे असा मंत्र संत ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथात सांगीतला आहे.असे सांगत माऊलींच्या आत्मचरित्र वर्णनाने सभागृह एक तासभर स्तब्ध झाले होते.
प्रवचनकार घडविणारे व्यासपीठ .=ह.भ.प.कु.भक्ती अनंतराव कुलकर्णी ह्या बिड मधिल के.एस.के.महाविद्यालय नवगण येथे बि.ए.प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत.येथे महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकाराबरोबर महिनाभर प्रवचन ऐकणार्यांना याठिकाणी नविन प्रवचनकार म्हणून संधी दिली जाते.यापुर्वी अनेक विद्यार्थ्यांना प्रवचन सेवा मिळाली आहे.एक प्रकारे हे व्यासपिठ म्हणजे प्रवचनकार घडविणारी कार्यशाळा तथा व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन त्यांनी करून संयोजकांना नवी ऊर्जा दिली असेच म्हणावे लागेल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें