भर वस्तीतील झाडाचे स्थलांतर.वीस फूट उंचीच्या वृक्षाचे जागा बदलून केले यशस्वी रोपण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

भर वस्तीतील झाडाचे स्थलांतर.वीस फूट उंचीच्या वृक्षाचे जागा बदलून केले यशस्वी रोपण.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२७ऑगस्ट २०१८

तालुक्यातील शेळगांव येथील शंभरी पार केलेल्या जिल्हा परिषद प्रशाळेच्या प्रांगणात चार वर्ष वयाच्या वटवृक्षास स्थलांतरित करून रोपन करण्यात आले आहे.
     या बाबतीत समजलेली सविस्तर माहिती अशी की,  सुमारे वीस फूट उंचीचा डेरेदार वटवृक्ष जेसीबीने मुळासकट खणून ट्रॅक्टरमध्ये चढवण्यात आला. दूसरा पर्यायच नसल्याने टू व्हीलरही मोठ्या मुश्कीलीने जाते अशा अवघड रस्त्यानी वृक्ष टेकडीवर असलेल्या प्रशालेच्या प्रांगणात आणण्यात आला. रस्सी लावून शिताफीने उतरण्यात आला. सात आठ फूट खोलीच्या खड्डयात वृक्ष लावला. झाडाला आधारा करीता मातीचा पाच फूटाचा थर जमीनीवर तयार केला. तसेच रस्सी ताणून बांधण्यात आली. अशाप्रकारचे अनोखे वृक्षारोपन करून ग्रामस्थांनी झाडाचे जतन व संगोपन कसे करावे याचा आदर्श नमुना सादर केला आहे. पर्यावरण जतन व संवर्धनाचे असे चित्र सहसा पहायला मिळत नाही. विकसित देशातील वृक्ष जतनाच्या धर्तीवर हा वृक्षराज उभा केल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
        या जिकिरीच्या व अनोख्या कामासाठी ग्रामस्थ भगवानराव गोरवे, मुंजाभाऊ खोसे, पांडूरंग गोरवे, सरपंच सखारामजी मुलगीर, पुंडलीकराव आम्ले, श्रीधर विटकर, नामदेव पौळ, बालाजी धोत्रे, सतीश शिंदे, माणिकराव मुलगीर, लक्ष्मण गोरवे, सोमनाथ जोगदंड, सुधाकर बेद्रे, गणेश निरस, रामेश्वर आळसे, नितीन बेद्रे, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक मुंढे एन.बी, आतराम आर. पी, भोसले जी.डी, श्रीमती कुलकर्णी, पंचांगे, खंदारे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें