प्रतिनिधी सेलू/आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे अगदी उत्साहामध्ये मुलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राम मैफळ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षक नानासाहेब पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाड नांद्रा हे होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच यावेळी मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे यांच्या असते *राखी निर्मिती स्पर्धेमधील सर्वोत्तम राखी निवडण्यात आली* यामध्ये शिवानी लंघे या विद्यार्थिनीची सर्वोत्तम राखी म्हणून निवड करण्यात आली*
*रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होतं, *" यावेळी मुलांनी राख्या बनविल्या त्या सर्व राख्या वृक्षांसाठी होत्या".आज वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते त्या प्रमाणात वृक्षांची लागवड होत नाही. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो. वाढते प्रदूषण. आदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यावेळी मुलांनी शालेय परिसरातील सर्व वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन करायचं ठरवलं* त्याप्रमाणे आज सर्व शिक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला.
त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना मुलींनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राम मैफळ यांनी भारतीय संस्कृतीतील रक्षाबंधन या कार्यक्रमा संदर्भात मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे नानासाहेब पवार यांनी सुद्धा मुलांना रक्षाबंधन व आज तुम्ही वृक्षांना राख्या बांधून दिलेला संदेश किती अमूल्य आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केलं.. कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवराज माने यांनी केलं. तर आभार प्रदर्शन संजय काकडे यांनी केलं.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें