कोक येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना संगणक चे ज्ञान अवगत होण्यासाठी संगणक संच शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे, परंतु शाळेत विद्युत पुरवठा उपलब्ध नसल्याने संगणक कसे चालवावे हाच मोठा प्रश्न आहे.
जिल्हा परिषद शाळेत लाईट नसल्याने बायोमेट्रिक थंब मशीन ओस पडलेली आहे.
आजच्या संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक पासून वंचित राहावे लागत आहे. पण यात विद्यार्थ्यांची काय चूक, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यांच्याजवळ याबाबत तक्रार केली तर तक्रार दाराला धमकावून चूप केले जात आहे, आम्ही आमची समस्या बघून घेऊ असे उत्तर मिळाले.
शासकीय जिल्हा परिषद च्या शाळेत राज्य सरकार कडून अनेक सुविधा आणि उपक्रम मिळत असतात पण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हे सर्वस्वी शाळेच्या कर्मचारी वृंदावर अवलंबून असते तसेच मुख्याध्यापक हेच शाळेच्या विकासाचा मुख्य कणा समजला जातो, पण दुर्दैवाने कोक येथील विद्यार्थ्यांना शासकीय सोयी सुविधा आणि शालेय शिक्षण उत्तम प्रकारे न मिळणे ही एक खेदाची बाब आहे.
यावर शासनाने योग्य पाऊल उचलावे आणि कोक येथील शालेय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें