जि. प .आरोग्य सभापती सौ. भावनाताई नखाते यांची माहिती.
पात्र १२५ प्रस्तावांना दिली मंजुरी.
परभणी (जिल्हा.प्रतिनीधी ) शमशेर खान
परभणी जिल्ह्यातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना दहा लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर केले असून यामध्ये १२५ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ.भावनाताई नखाते यांनी दिली
जिल्हा परीषदेच्या अर्थसंकल्पात जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ .भावनाताई अनिलराव नखाते यांच्या विशेष पुढाकाराने ह्रदयरोग ,किडनी व कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून आर्थिक साह्य देण्याकरीता दहा लक्ष रुपयांची तरतूद केली होती .त्यानंतर या योजनेअंतर्गत दुर्धर आजाराच्या रूग्णांना या अर्थसहाय्याचा लाभ मिळावा यासाठी सौ .नखाते यांनी प्रस्ताव दाखल करण्यासाठी अवाहन केले होते.या योजनेसाठी २०६ प्रस्ताव दाखल झाले होते. २ आँगष्ट २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज ,जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी .एम .शिंदे ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. खंदारे यांची उपस्थिती होती . या समितीच्या बैठकीत प्राप्त २०६ प्रस्तावाची छाननी करण्यात आली त्यामध्ये १२५ प्रस्ताव पात्र ठरले .उपलब्ध १० लक्ष रुपयांची तरतुद मधून १२५ दुर्धर आजार रुग्णांना प्रत्येकी ८ हजार रुपये असे दहा लक्ष रुपयाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदरील अर्थसाहाय्य रक्कम ही रुग्णांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएस पाठविण्याचे निर्देश दिले यावेळी देण्यात आले.. दुर्धर आजारी रूग्णांच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिल्यामुळे १२५ रुग्णांना आर्थिक सहाह्य मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे .गतवर्षीही सौ भावनाताई नखाते यांच्या पुढाकाराने १४ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य दुर्धर रूग्णांना वाटप करण्यात आले होते.
ज्या घरातील व्यक्ती दुर्धर आजाराने त्रस्त असेल असे कुटुंबतील सदस्य नेहमी संकटात असतात त्यामुळे अशा कुटुंबांना तात्काळ अर्थ साहाय्याची मदत व्हावी यामुळे सदरील प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे.अशा कामामुळे समाधान मिळते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें