सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८ऑगस्ट २०१८
सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यात मृग नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने खरीप हंगामातील पिकांची लागवड केली; परंतू मागील महिन्याभराहून अधिक कालावधी पासून पावसाने दडी मारल्यामुळे चांगली आलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. येनाऱ्या दोन चार दिवसांत पाऊस पडला नाही तर दुष्काळास सामोरे जावे लागेल अशी भयावह परिस्थिती तालूक्यात निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुका तसेच महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडावा यासाठी भक्तगणांनी पायी चालत 'हलगी, ताशाच्या गजरात व हर हर महादेवाच्या जय घोषात' गोदावरी नदीपात्रातील पाणी आणून ग्रामदैवत असलेल्या सोमेश्वराची विधीवत पुजा करून व पाण्यात बुडवून पाऊस पडण्यासाठी साकडे घातले. या वेळी शहरातील हनुमान मंदीर, देवीमंदीर, रामेश्वर, नगरेश्वर, खंडोबा आदी देवी देवतांनाही पाणी घालुन दमदार पावसा साठी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमात शहरातील गणेशनगर, संभाजीनगर, दहीखेड, निर्गुळओटा, वडकर गल्ली, सारडा गल्ली, ईनामदार वसाहत, वारीगल्ली, देवीमंदीर परिसर, रामेश्वर मंदीर परिसर आदी भागातील अनेक महिला व पुरुष भक्तगण मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें