सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०८ऑगस्ट २०१८
स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घणकचरा व्यवस्थापणा साठी शासनाच्या वतीने सोनपेठ नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या तीन घंटागाड्यांचे मंगळवारी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते चंद्रकांत राठोड, माजी उपनगराध्यक्ष दिगांबर भाडूळे पाटील, नगरसेवक, अँड. श्रीकांत विटेकर, नगरसेवक निलेश राठोड, पो.नि. सोपान सिरसाठ, नगरसेवक विनोद चिमनगुंडे, अब्दुल रहेमान सौदागर, लक्ष्मीकांत कांदे, नजीर राज, शरद बनसोडे, अम्रत स्वामी, सुनिल बर्वे, डॉ. श्रीनिवास गुळभिले, धनंजय घुगे, शेख युनूस, प्रमोद गावरस्कर, मलिक बागवान, श्रीराम वांकर, नितीन भाडूळे, प्रतिष्ठीत नागरीक, पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते,
मागील दोन वर्षापासुन स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नगर परिषदेने सहभाग घेऊन विविध पारितोषिके प्राप्त केले आहेत. नगरपरिषदेचा स्वच्छता अभियानात सहभाग लक्षात घेता सुका कचरा, ओला कचरा स्वतंञरित्या संकलन करण्यासाठी तीन घंटा गाड्या देण्यात आल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें