रोटरी क्लब सोनपेठ च्यावतीने रक्त गट तपासणी व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 13 अगस्त 2018

रोटरी क्लब सोनपेठ च्यावतीने रक्त गट तपासणी व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१३ऑगस्ट २०१८
जिल्हा परिषद प्रशाला सोनपेठ येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब सोनपेठ च्यावतीने दि.१३ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी रक्त गट तपासणी व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप  करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रो. संतोष निर्मळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ, श्रीनिवास गुळभिले, डॉ. धनंजय पवार, डॉ. कल्पेश लांडे व मुख्यध्यापक सुमित लांडे हे होते. तर  रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड, रो.बालमुकुंद सारडा, रो.घनःश्यामदास झंवर, रो.किरण चोलवार, रो.अनिल शेटे, रो.नागनाथ सातभाई, जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष बळीराम काटे आदींसह पत्रकार बाबासाहेब गर्जे, गणेश पाटील व शिवमल्हार वाघे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. आजपासून वर्षीभरात १०,००० विद्यार्थ्यांचे रक्त गट मोफत तपासणी करण्यात येनार असल्याचे अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात १० तर एकुण ११८ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर २६१ विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी करण्यात आली. रक्त गट तपासणी साठी परळी वैजनाथ येथील नामांकित मातोश्री पॅथॉलॉजी लॅबरोटरीचे गजानन गर्जे व त्यांच्या टीम ने विशेष कार्य केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक संदीप लष्करे व अश्रोबा सावंत यांनी केले तर कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी रविकुमार स्वामी, नितीन सज्जनशेट्टी, शुभम भोसले, वाजेद शेख यांच्यासह  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें