सिल्लोड : प्रतिनिधी (दि.१४) -
सिल्लोड - सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतक-यांना संपुर्ण वर्षांची नुकसान भरपाई देण्यात यावी व इतर विविध मागण्यांसाठी सिल्लोड - सोयगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेले साखळी उपोषण सलग दुस-या दिवशीही अविरतपणे सुरु ठेवण्यात आले. सिल्लोड - सोयगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतक-यांना आर्थिक मदत देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढावेत असी मागणी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केली आहे .
------------------------ उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसिलदार संतोष गोरड यांनी आ.अब्दुल सत्तार यांच्याशी उपोषणस्थळी येऊन विविध मागण्यांसंबंधी सकारात्मक चर्चा करून दोन्ही तालुक्यांतील पिकांच्या परिस्थिती बाबत तसेच झालेल्या अत्यल्प पावसामुळे पिकांची व पिण्याच्या पाण्याच्या स्थितीवर चर्चा केली गेली. तसेच लवकर पाऊस न झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत पिकांच्या स्थितीवर अधिक परिणाम होऊन अजून बिकट होण्याच्या शक्यतेचा धोकाही चर्चेतून बोलून दाखवीत आला. उद्या स्वातंत्र्य दिनही असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने उपोषणकर्ते व प्रशासनात चर्चेचे सत्र सुरूच होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपोषण सतत सुरू असणार की एक दिवसाचा खंड देऊन अविरतपणे सुरू राहील की मागे घेतल्या जाईल या बाबत काही निर्णय होऊ शकला नाही.
-------------------- यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रा.मन्सूर कादरी ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, अशोक सुर्यवंशी, महिला जिल्हाउपाध्यक्षा दुर्गाबाई पवार , उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, विक्रांत दौड,
माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, रुपेश जैस्वाल, नगरसेवक रऊफ बागवान , राजरत्न निकम, सत्तार हुसैन,राजु गौर, लड्डू पटेल, शांतीलाल अग्रवाल, शेख बाबर,राजु दुधे, सुपडू कुरैशी, राजु बागवान,
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतिश ताठे, अब्दुल रहिम, दामोधर गव्हाणे, नरसिंगराव चव्हाण , राजाराम पाडळे , प्रभाकर ब्राह्मणे, मनोज झंवर, राजुमिया देशमुख, विश्वासराव दाभाडे, अनिस पठाण, सुखदेव जिवरग, मतीन देशमुख, नामदेव खंडागळे, अमित कळम, लक्ष्मण तायडे, मोबिन पठाण, मियाभाई, राजेंद्र बन्सोड, हाजी मोहम्मद हनिफ, मधुकरराव बेंडाळे, शांतीलाल बसेय्यै, कृष्णा ऊखर्डे, खालेद पटेल, रघुनाथ कल्याणकर, प्रा.संजय फरकाडे, रविंद्र तुपे, संजय मुरकुटे, मुश्ताक बापु देशमुख, दिलीप गवळी, सुनिल लांडगे, गणेश डकले, संभाजी हावळे, अजगर झारेकर, कुणाल सहारे, लक्ष्मण कल्याणकर, मच्छिंद्र दांडगे, राजेश्वर आरके, सुनिल साखळे, अमित आरके, राजु साठे,मनोहर आरके, राजु सुरडकर, जमीर मुलतानी, समाधान साळवे, राजु सुरडकर, सुभाष जाधव,एकनाथ शिंदे, भावराव दुधे, रवि आरके, जगन्नाथ कुदळ, अमोल कुदळ, फईम पठाण, तौसिफ पठाण आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें