प्रशासनामुळे सुटला अंत्यसंस्काराचा तिढा .बोरकिनी येथील प्रकार . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

प्रशासनामुळे सुटला अंत्यसंस्काराचा तिढा .बोरकिनी येथील प्रकार .



सेलू  (प्रतिनिधी) शमशेर खान.
           सेलू तालुक्यातील बोरकीनी येथे गावात स्मशानभूमी नसल्याने निधन झालेल्या आश्रोबा परीहार यांचे अंत्यसंस्कार कुठे करावे याबाबत प्रश्न निर्माण झाला होता  प्रकरणी महसुल व पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेतल्यामुळे शासकीय गावठाण जमिनीत अंत्यसंस्कार केल्याने हा तिढा सुटला .
                              बोरकिनी येथील आश्रोबा तुकाराम परीहार (वय ७५ वर्षे )  यांचे ७ आँगष्ट रोजी रात्री निधन झाले होते . गावात  स्मशानभूमीत नसल्याने  अंत्यसंस्कार करणेबाबत चा प्रश्न निर्माण झाला होता याप्रकरणी वाद निर्माण होऊ नये म्हणून अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मयताच्या नातेवाईकांनी सेलू तहसील व चारठाणा पोलीस ठाणे त्यांच्याशी संपर्क साधला. नायब तहसीलदार प्रशांत थारकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी बोरकिनी येथे भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी चर्चा केली.बहुतांश जणांना परीसरात शेती असल्याने त्यांना अडचण येत नाही परंतू परीहार कुटुंबीयांना परीसरात शेती नसल्याने हा प्रश्न उद्भवला आहे .त्यामुळे  मयताचे अंत्यसंस्कार शासकीय गावठाण जमिनीवर ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वा. अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.महसुल व पोलिस प्रशासन यांनी वेळीच दखल घेतल्याने   मयत आश्रोबा तुकाराम परिहार त्यांचा अंत्यसंस्काराचा तिढा अखेर सुटला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें