सेलू प्रतिनिधी
सेलू : सार्वजनिक बांधकाम
बिभागामार्फत करण्यात येत असलेल्या
रस्त्यांची कामे न्यु रामेश्वर कन्स्ट्रक्शन
कंपनीमार्फत निकृष्ट दर्जाची करण्यात
येत असल्याने सदरल कामाची चौकशी
करून अंदाजपत्रकाची माहिती देण्याची
मागणी माजी आ. हरीभाऊ लहाने यांनी
सा. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता
यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यामध्ये गुगळी धामणगाव,
कुंडी, रेल्वे स्थानक ते रायगड नाका,
मोरेगाव ते हातनुर यासह तालुक्यात
विविध ठिकाणी करण्यात आली
आहेत मात्र सदरिल कामे ही निकृष्ट
दर्जाची करण्यात आली आहेत. या
कामाची चौकशी करुन ही कामे अंदाज
पत्रकाप्रमाणे करण्यात आली की नाही
याची चौकशी करण्यात यावी. या
कंपनीमार्फत तालुक्यामध्ये करण्यात
आलेल्या रस्ते कामाची दक्षता व
गुणनियंत्रक विभागामार्फत येत्या १५
शिकः चौकशी करण्यात यावी.
नसता मंत्रालयात आंदोलन करण्याची
तयारी माजी आ. हरीभाऊ लहाने यांनी
दिलेल्या निवेदनात दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें